छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचवणे, संघटन मजबुती, आगामी राजकीय नियोजन तसेच स्थानिक जनतेच्या विविध प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठक मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
चितलांगे व बिपिन नाईक उपस्थित होते. बैठकीचे आयोजन शहर जिल्हा सचिव राहुल पाटील यांनी केले. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप
यावेळी अमित भांगे, कार्तिक फरकडे पाटील, रोहित ठेंगे, नीरज बरेजा, राजाभाऊ राऊत, बाबुराव जाधव, सिताराम सपकाळ, चंदू नवपुते, संतोष राजपूत, विशाल शास्त्री, सुनील देवकर, सुमित लिंभारे, विलास पाटील, मनोज भिंगारे, अनुप खर्चे, आकाश राठोड,
कैलास लांडगे, गणेश खंडागाळे, कृष्णा पाटील, गजानन उफाड, पवन खेळवणे पाटील, अभिजित पाठक, चिंतामण मेत्रे, ऋषिकेश गावंडे, सिद्धार्थ मोकळे, शिवराज जाधव, राकेश मलवाड, गणेश सपकाळ, विजय मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळात मध्य विधानसभा क्षेत्रात मनसेची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













